accidentRain

ठाण्यात वारा आणि पावसामुळे झाडं पडून गाड्यांचं नुकसान

ठाण्यामध्ये काल पावसाचा फारसा जोर नव्हता मात्र २ वेगवेगळ्या ठिकाणी झाडं पडल्यानं तर एका ठिकाणी इमारतीच्या छतावरील पत्रे पडले मात्र सुदैवानं जिवितहानी झाली नाही. वागळे इस्टेट येथील टोयॅटो शोरूमच्या समोर एका रिक्षावर झाड पडल्यानं योगेश विश्वकर्मा आणि राजेंद्र विश्वकर्मा हे दोघे जखमी झाले. आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलानं रिक्षावर पडलेले झाड तोडून बाजूला केलं. ठाण्यातील गोखले रस्त्यावरील अर्जुन टॉवरच्या समोर असलेल्या चाणाक्ष या इमारतीत एक झाड दोन महागड्या गाड्यांवर पडल्यामुळे त्यांचं नुकसान झालं. भगवान मढवी यांच्या जग्वार रेंज रोव्हर स्पोर्टस् आणि मर्सिडीज बेन्झ जीएल ३५० या दोन गाड्यांवर हे झाड पडल्यामुळे गाड्यांचं नुकसान झालं.

Comment here