ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या ‘सोसायटी स्पेशलिस्ट समीट’मध्ये सोसायटी व्यवस्थापनाचे धडे

ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि बीएनआय संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सोसायटी स्पेशलिस्ट समिट या मार्गदर्शनपर संवाद कार्यक्रमात गृहनिर्माण सोसायट्यांच्या सदस्यांना सोसायटी व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. या कार्यक्रमात ठाण्यातील सुमारे ३०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांनी सहभाग घेतला होता. यावेळी उपस्थितांना हाऊसिंग सोसायटी व्यवस्थापनात येणाऱ्या समस्या कशा सोडवाव्यात याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येतात. याअंतर्गत ठाणे हाऊसिंग फेडरेशन आणि बीएनआय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सोसायटी स्पेशलिस्ट समिट हा मार्गदर्शनपर संवाद कार्यक्रम झाला. गृहनिर्माण संस्था चालविताना अनेक समस्या येत असतात. तसेच एखाद्या गृहनिर्माण सोसायटीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या परवानग्या कशा मिळवाव्यात, कागदपत्रांची पूर्तता कशी करावी या संबंधित ठाणे हाऊसिंग फेडरेशनतर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. याच अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सोसायटी स्पेशलिस्ट समिट कार्यक्रमात सहभागी झालेल्या गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये उपस्थितांना तंटामुक्त समिती, गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन यांसारख्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तर तंटामुक्त समिती तिचे चालणारे कार्य, समितीची रचना यावर उपस्थितांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. ठाणे हौसिंग फेडरेशन अध्यक्ष सीताराम राणे, उपनिबंधक डॉ. अविनाश भागवत, नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading