Social

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय लवकरच होणार पूर्णत: डिजीटल

सव्वाशे वर्ष पूर्ण करणारं ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय आता काळाच्या पावलाप्रमाणे चालत असून लवकरच हे ग्रंथालय पूर्णत: डिजीटल होणार आहे. ही माहिती ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी दिली. मराठी ग्रंथसंग्रहालयातील पुस्तकांचं डिजिटलायझेशन सुरू असून येत्या ६ महिन्यात हे डिजिटलायझेशन पूर्ण होईल. त्यानंतर मराठी ग्रंथसंग्रहालयातली पुस्तकं ऑनलाईनही पाहता येतील, वाचता येतील. ठाणेकरांनी मराठी ग्रंथालयाचं सदस्यत्व स्वीकारावं असं आवाहनही वालावलकर यांनी यावेळी केलं. सध्या ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे ६ हजार सदस्य असून हे सदस्य १० हजार करण्याचं उद्दिष्ट आहे. संग्रहालयाचे १० हजार सदस्य झाल्यास अनेक उत्तमोत्तम योजना राबवता येतील असंही वालावलकर यांनी सांगितलं. ज्याप्रमाणे पिझ्झा घरपोच येतो त्याप्रमाणे पुस्तकं घरपोच देण्याची योजना असल्याचंही विद्याधर वालावलकर यांनी सांगितलं.

Comment here