TMC

ज्या ठिकाणी कमी अथवा विस्कळीत पाणी पुरवठा होतो अशा ठिकाणी टँकरद्वारे विनामूल्य पाणी पुरवठा करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

शहरामध्ये ज्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा किंवा विस्कळीत पाणी पुरवठा होत आहे अशा ठिकाणी १५ जून पर्यंत विनाशुल्क टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेकडे येणा-या तक्रारींच्या अनुषंगानं महापालिका आयुक्तांनी एका आढावा बैठकीत याचा आढावा घेतला. त्यावेळी ज्या ठिकाणी पाणी पुरवठा कमी आहे तसंच पाणी पुरवठा विस्कळीत आहे आणि जे लोक नियमितपणे पाणीपट्टी भरतात अशा ठिकाणी १५ जून पर्यंत महापालिकेच्या वतीनं टँकरद्वारे विनाशुल्क पाणी पुरवठा करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. शहरामध्ये ज्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा होतो अशा ठिकाणची यादी पाणी पुरवठा विभागानं तयार करावी त्यानुसार पाण्याचे टँकर पुरवावेत यासाठी वेळ पडल्यास खाजगी टँकर ताब्यात घेऊन त्यांच्यामार्फतही पाणी पुरवठा करावा असे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी महापालिकेची वितरण व्यवस्था नसल्यानं पाणी पुरवठा होत नाही त्या ठिकाणी टाक्या बसवून टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा तसंच ज्या ठिकाणी छोटे टँकर जात असतील त्या ठिकाणी छोट्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशा सूचनाही महापालिका आयुक्तांनी केल्या. मुंब्रा येथे रमजान ईदच्या काळात शुक्रवारी असणा-या पाणी पुरवठा बंदच्या काळात पहाटे ३ ते ६ या वेळेत टँकरने तसंच इतर दिवशी ज्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा झाला असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Comment here