Rain

जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६६ मिलीमीटर पाऊस

जिल्ह्यामध्ये काल सरासरी ६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर ठाणे शहरात गेल्या २४ तासात ६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र संध्याकाळनंतर पावसानं जोर धरला होता. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ११२ मिलीमीटर पाऊस शहापूरमध्ये तर सर्वात कमी म्हणजे ४१ मिलीमीटर पाऊस अंबरनाथमध्ये झाला. ठाण्यामध्ये ६०, कल्याणमध्ये ६८, मुरबाड आणि उल्हासनगरमध्ये प्रत्येकी ६५ तर भिवंडीमध्ये ५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

Comment here