geographical

चंद्राचा आकार कमी होत असल्याचा नासाच्या संशोधकांचा दावा

चंद्राचा आकार कमी होत असल्याचा दावा नासाच्या संशोधकांनी केला आहे. ही माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह चंद्र हा पृथ्वीवासियांचे महत्वाचे आकर्षण ठरला आहे. सुमारे साडेचार अब्ज वर्षापूर्वी चंद्राचा जन्म झाला. चंद्राचा व्यास ३ हजार ४७६
किलोमीटर आहे. मात्र आता हा आकार ५० मीटरने कमी झाल्याचं संशोधन नासाने जाहीर केल्याचं सोमण यांनी सांगितलं. पृथ्वीवर जसा भूकंप होतो तसा चंद्रावरही
चंद्रकंप होत असतो. चंद्राचा पृष्ठभाग आकसत आहे. त्यामुळं चंद्राचा आकार कमी झाल्याचा शास्त्रज्ञांचा प्राथमिक अंदाज आहे. चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ८४ हजार
किलोमीटर अंतरावर आहे. टायडल फोर्समुळे चंद्र दरवर्षी २८ सेंटीमीटरनं पृथ्वीपासून दूर जात आहे. चंद्र ज्यावेळी पृथ्वीजवळ येतो त्यावेळी तो मोठा दिसतो आणि
ज्यावेळी पृथ्वीपासून दूर जातो त्यावेळी पृथ्वीवरून पाहताना चंद्रबिंब लहान दिसते. पण नासाच्या शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात चंद्राचा आकार ५० मीटरनं लहान झाल्याचं म्हटलं
आहे. अर्थात याचा पृथ्वीवर काही परिणाम होणार नाही. हजारो वर्षात हा बदल होतच असतो. बुधाचा आकारही कमी होत आहे. पृथ्वीचाही स्वत:भोवती भ्रमण करण्याचा
वेगही मंदावत आहे असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Comment here