crime

काळ्या जादूसाठी वापरल्या जाणा-या मांडूळ जातीच्या सर्पाची तस्करी करण्याप्रकरणी एका व्यक्तीस अटक

काळ्या जादूसाठी वापरल्या जाणा-या मांडूळ जातीच्या सर्पाची तस्करी करण्याप्रकरणी एका व्यक्तीस गुन्हे शाखेनं गजाआड केलं आहे. गुन्हे शाखेला तीन व्यक्ती मांडूळ जातीचा साप विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार खारेगाव टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला आणि माहितीनुसार जावेद शेख या व्यक्तीला पकडण्यात आलं. त्याच्याकडील पिशवीमध्ये एक जिवंत मांडूळ जातीचा साप हस्तगत करण्यात आला. काळी जादू आणि औषधासाठी हा साप वापरला जातो.

Comment here