crime

एटीएममध्ये एका युवतीसमोर अश्लील वर्तन करण्याप्रकरणी एका उच्चशिक्षित युवकाला अटक

एटीएममध्ये एका युवतीसमोर अश्लील वर्तन करण्याप्रकरणी एका उच्चशिक्षित युवकाला पोलीसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री अडीचच्या सुमारास शिबानी ही युवती मुलुंडमध्ये रिक्षा चालकाला पैसे देण्यासाठी म्हणून एटीएममध्ये गेली होती. पण पैसे काढत असताना समस्या उद्भवल्यामुळं एटीएममध्ये असलेल्या ठाण्यातील संदीप कुंभारकर या युवकानं रिक्षा चालकाला पैसे देण्यासाठी म्हणून पैसे पुढे केले. त्यावेळी शिबानीनं त्याला नकार दिला असता संदीप कुंभारकरनं तिच्याशी अश्लील वर्तन केलं. हा प्रकार तिनं आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हे पाहून संदीप कुंभारकर तिथून गायब झाला. एटीएमच्या बाहेर येत असताना गस्तीवरील पोलीसांची गाडी पाहून तिनं पोलीसांना मोबाईलवर चित्रीत केलेला हा प्रकार दाखवला. पोलीसांनी पाठलाग करून संदीप कुंभारकरला पकडलं. संदीप कुंभारकर हा उच्चशिक्षित असल्याचं सांगितलं जातं.

Comment here