zp

अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांचं आवाहन

जिल्ह्यामध्ये एकूण २१ शाळा अनधिकृत असून या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश घेऊ नये. असा प्रवेश घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालकांची असेल असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी कळवलं आहे.

TMC

पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्याचं महापालिका आयुक्तांचं आवाहन

पावसाळ्यामध्ये कोणतेही साथीचे आजार होऊ नयेत यासाठी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलं आहे.

traffic police

खारकर आळी, जांभळीनाका परिसरातील रहिवासी मोठ्या प्रमाणावरील रहदारीमुळं हैराण

खारकर आळी, जांभळीनाका परिसरातील रहिवासी मोठ्या प्रमाणावरील रहदारीमुळं हैराण झाले असून नियम तोडून वाहन चालवणा-या वाहन चालकांवर कारवाई होत नसल्यामुळं रस्त्यावरून चालणंही मुश्कील झालं आहे.

social

पुरूष प्रधान संस्कृतीच्या गर्तेत अडकलेल्या दोन युवती दहावी-बारावी उत्तीर्ण

आज सर्वच क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून अग्रेसर असल्या तरी पुरूषप्रधान संस्कृतीचा त्रास अनेक मुली-महिलांना सहन करावा लागतो.

Ncp political

१५ दिवसात वीजेचा लपंडाव न थांबवल्यास वीज मंडळाच्या कार्यालयांवर आंदोलन छेडण्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा

वीजेचा लपंडाव थांबवावा अन्यथा जिल्ह्यातील सर्वच वीज मंडळाच्या कार्यालयांवर आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

cultural social

ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या लोकजागर उपक्रमांतर्गत विंदायन कार्यक्रमाचं आयोजन

ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या लोकजागर उपक्रमांतर्गत विंदायन कार्यक्रमाचं आयोजन २० जूनला करण्यात आलं आहे.

education

बालविज्ञान परिषद २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान

यंदाची बालविज्ञान परिषद २७ ते ३१ डिसेंबर रोजी होणार आहे. केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे गेली २५ वर्ष राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचं आयोजन केलं जात आहे.

acb crime

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याबरोबर त्यांच्या दोन सहका-यांनाही लाच घेताना अटक

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याबरोबरच त्यांच्या दोन सहका-यांनाही लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.