काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने आणखी एकाला केली भिवंडीतून अटक

भिवंडीतील काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने आणखी एकाला भिवंडीतून अटक केली.प्रल्हाद तांगडी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावरही मोक्कोंतर्गत कारवाई केली आहे. तांगडी याच्या अटकेमुळे आरोपींची संख्या आता 20 झाली आहे. तर अद्यापही सात जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 2017 रोजी कॉंग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांची हत्या झाली होती.हे प्रकरण ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग केल्यानंतर पोलिसांनी मुख्य सूत्रधार असलेल्या प्रशांत म्हात्रे याच्यासह 18 जणांना अटक केली.या सर्वाना मोक्का लावला असून सद्यस्थितीत ते न्यायालयीन कोठडीत आहेत.या खूनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या उदयभान सिंग याला उत्तरप्रदेशातून अटक केली.त्यानंतर,लगेचच खंडणी विरोधी पथकाने तांगडी याच्या मुसक्या आवळल्या.त्यांना न्यायालयात हजर केल्यावर सिंग आणि तांगडी याना 4 जुलैर्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे.तांगडी हा मुख्य सूत्रधार प्रशांत म्हात्रे याचा मेहुणा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading