प्रवेशप्रक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत राबवण्याची निरंजन डावखरे यांची मागणी

राज्यातील अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, वास्तूशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन आदी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत राबवावी, अशी आग्रही मागणी
उच्च-तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया खाजगी संकेतस्थळामार्फत राबविण्यात येत होती. मात्र, या कंपनीच्या सर्व्हरवरील भार वाढल्यामुळे प्रक्रिया संथ होत होती. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी भरलेली माहिती संलग्नित करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. या प्रकारांमुळे सदोष माहितीच्या आधारावर गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर अन्याय होण्याची भीती होती. या पार्श्वभूमीवर प्रवेश नियामक प्राधिकरणाने नोंदणीला स्थगिती दिली. या संदर्भात कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी उच्च-तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले. या प्रवेशप्रक्रियेबाबत उच्च आणि तंत्र शिक्षण संचालनालयाला परिपूर्ण तांत्रिक माहिती आहे. तसेच यापूर्वीच्या प्रवेशप्रक्रिया संचालनालयाकडून पार पाडण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्रासह व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रक्रिया उच्च आणि तंत्रशिक्षण संचालनालयाकडे सोपविणेच योग्य ठरेल, असे आमदार डावखरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading