Ncp political TMC

कळवा रेल्वे स्थानकाला कालव्याशी जोडणारा नवीन रस्ता बांधून लाखो रहिवाशांना मोठा दिलासा

जीव धोक्यात घालून रेल्वे स्थानक गाठणाऱ्या कळवेकरांना आमदार जितेंद्र आव्हाड आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिवाळी भेट दिली आहे. कळवा रेल्वे स्थानकाला कालव्याशी जोडणारा नवीन रस्ता बांधून लाखो रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे. लवकरच या रस्त्यावरून ठाणे परिवहनची बसही धावणार आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवेकरांना कामांचा वचननामा दिला होता. तो वचननामा झपाट्याने पूर्ण होत आहे. खारेगावमधील रहिवाशांना कळवा रेल्वे स्थानकात येण्यासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे पटरी ओलांडून जावं लागत असे. आता या मार्गावर सिमेंट काँक्रीटचा पक्का रस्ता तयार झाल्याने येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसंच कळव्यातील रेल्वे प्रवाशांना बाजाराच्या गर्दीतून रेल्वे स्थानक गाठावे लागत होते. आता या रस्त्याने कळवेकरांना थेट गाडीवरून रेल्वे स्थानक गाठता येणार आहे. या भागांतून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी रहिवाशांच्या घरांमध्ये शिरायचे. यासाठीही मोठा नाला बांधण्यात आल्याने तो प्रश्नही मिटला आहे. या मोठ्या नाल्यावरून सिमेंट काँक्रीटचा भक्कम रस्ता बांधला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी पाठपुरावा करून कळवेकरांना या रस्त्याची दिवाळी भेट दिली आहे. विरोधी पक्ष नेता मिलिंद पाटील यांनी बुधवारी या रस्त्याला धावती भेट देऊन पाहणी केली आणि कामाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. जानेवारी महिन्यात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *