ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभागातील नव प्रवेशोत्सव प्राणी पक्ष्यांबरोबर हसत खेळत साजरा

ब्राह्मण शिक्षण मंडळ संचालित ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभागातील नव प्रवेशोत्सव प्राणी पक्ष्यांबरोबर हसत खेळत साजरा करण्यात आला. चिमुकल्यांच्या भावविश्वातील पहिला दिवस प्रसन्नमय आणि आनंदी असावा या उद्देशानं मोर, ससा, बांडा, पोपट अशी आकर्षक वेशभुषा करणा-या मोठ्या शिशुची प्राणी पक्ष्यांची सेना यासाठी सज्ज झाली होती. यावेळी पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका रोहिणी दिवाण तसंच प्राथमिकच्या मुख्याध्यापिका नम्रता वडे यांनी मुलांना औक्षण करून चॉकलेट देऊन स्वागत केलं. पूर्व प्राथमिकच्या शिक्षकांनी शाळेचा पहिला दिवस आनंदात पार पडण्यासाठी दिव्यांची आरास, रांगोळ्यांसह सजावट केली होती. याचबरोबर घसरगुंडी, क्रिकेट, बास्केटबॉल, मनोरा आदी खेळ खेळण्यात मुलं दंग होऊन गेली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading