TMC

दिवा स्टेशन ते दातिवली चौक या रस्त्याच्या रूंदीकरणा दरम्यान करण्यात आलेल्या धडक कारवाईत १५० गाळे जमीनदोस्त

गेल्या ५ ते ६ वर्षांपासून दिवा स्टेशन ते दातिवली चौक या रस्त्याच्या रूंदीकरणाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या धडक कारवाईत १५० गाळे जमीनदोस्त करण्यात आले तर २०० हातगाड्या तोडून टाकण्यात आल्या. या कारवाईनंतर रस्ता रूंदीकरणाचे काम तातडीने सुरू करण्यात आले. महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात या कारवाईला सुरूवात झाली. दिवा स्टेशन पूर्व परिसरात अनधिकृत बांधकामांमुळे रस्ता रूंदीकरणाचे काम रखडले होते. त्याचबरोबर तेथील तलावाभोवतीही अनधिकृत बांधकामाचा आणि हातगाड्यांचा विळखा पडला होता. आज या धडक कारवाईमुळे दिवा स्टेशन परिसर ते दातिवली चौक परिसर पुर्णत: मोकळा झाला. या कारवाईमध्ये तेथील दुकानदारांनी केलेली वाढीव बांधकामेही तोडून टाकण्यात आली. दरम्यान उद्या दिवा स्टेशन ते साबे गाव रस्ता रूंदीकरणाची कारवाई सुरू राहणार आहे. या कारवाई नंतर महापालिका आयुक्तांनी रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिल्याने नगर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *