sports

राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठी ठाण्याचा संघ जाहीर

राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठी ठाण्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत हा संघ जाहीर करण्यात आला. या संघात ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, वाशिंद, वाशी अशा विविध ठिकाणच्या ४४ स्पर्धकांचा समावेश आहे. या ४४ मध्ये शहरातील ५ खेळाडू आहेत. जिल्हा मानांकन अजिंक्यपद स्पर्धेत हृदय जैन यानं १० वर्षाखालील मुलांच्या गटात सलग सहाव्यांदा अजिंक्यपद पटकावताना जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडू असा किताबही पटकावला. सहा वर्षाच्या मयुरेश सावंतनं जिल्ह्याच्या १० वर्षाखालील संघात स्थान पटकावलं. त्याचबरोबर मधुरा महाजन, सिध्दांत देशपांडे, हिया विश्वनाथ या खेळाडूंनी जिल्ह्याच्या १२ वर्षाखालील संघात स्थान पटकावलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *