crime

इकबाल कासकरसह ५ जणांवर मोक्का कायद्याखाली गुन्हे दाखल

ठाणे पोलीसांनी अखेर मोक्का कायद्याखाली इकबाल कासकरसह ५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला ५ कोटींची खंडणी मागण्याप्रकरणी इकबाल कासकर आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली होती. यामध्ये नंतर आणखी दोघांची भर पडली. पोलीसांनी संघटित गुन्हेगारी कायद्याखाली या सर्वांवर कारवाई केली आहे. छोटा शकील, इकबाल कासकर, मुमताज शेख, इसरार सय्यद आणि पंकज गंगर या ५ जणांवर मोक्कान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी छोटा शकील सोडता बाकी सर्वजण ठाणे पोलीसांच्या ताब्यात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *