खवले मांजर विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक

जंगली खवले मांजर विक्रीसाठी आलेल्या तिघांना ठाणे ग्रामीण पोलीसांनी जेरबंद केलं आहे. काल संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास भाईंदर पूर्व येथील मीनाताई ठाकरे मंडईत जंगली खवले मांजराच्या विक्रीकरता काहीजण लाल रंगाच्या रेनॉल्ड क्वीड या गाडीतून येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार भाईंदर विभागाच्या पोलीसांनी अशा गाडीतून आलेल्या सचिन ढोले, निलेश मुंडे आणि सतिश बहिरे अशा तिघांना पोलीसांनी रंगेहात पकडलं. या तिघांकडे ५ किलो वजनाचे जंगली खवले मांजर मिळाले. या जंगली खवले मांजराची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २२ लाख रूपये किंमत असल्याचं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading