मधुमेही नेत्र आणि किडनी शिबीरास जिल्ह्यातील गरजू रूग्णांच्या अभूतपूर्व प्रतिसादाची नोंद होणार गिनीज बुकमध्ये

मधुमेही नेत्र आणि किडनी शिबीरास जिल्ह्यातील गरजू रूग्णांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून या प्रतिसादाची नोंद गिनीज बुकमध्ये होणार आहे. ठाण्याच्या टाऊन हॉलमध्ये आयबेटीस फौंडेशन, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि डॉ. निशांतकुमार यांनी आयोजित केलेला संयुक्त सेवाभावी उपक्रम पार पडला. यामध्ये एका दिवसात मधुमेहाच्या सर्वाधिक म्हणजे १२२४ नेत्र तपासण्या करण्यात आल्या. मधुमेह अंधत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. त्याचप्रमाणे भारतात मूत्रपिंड निकामी होणं आणि त्यामुळं कराव्या लागणा-या डायलिसीस मागील प्रमुख कारणही मधुमेहच आहे. मधुमेहामधील डोळ्यांच्या तसंच मूत्रपिंडाच्या विकाराचं निदान सुरूवातीच्या टप्प्यात झाल्यास त्यांना अंधत्व, डायलिसीस आणि मृत्यूपासून वाचवणं शक्य आहे. आयबेटीसने मधुमेहामुळे होणा-या नेत्रविकारांच्या चाचण्यांसाठी अतिप्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला. दीडशेहून अधिक डॉक्टर्स, परिचारिका, ऑप्टिशियन्स, निमवैद्यकीय कर्मचारी यांनी ग्रामीण भागातील मधुमेह रूग्णांच्या तपासण्या केल्या. एका दिवसात सर्वाधिक मधुमेहाशी संबंधित नेत्र तपासण्या आणि मूत्रपिंड विकाराच्या चाचण्या करण्याबाबत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम प्रस्थापित होऊ शकेल अशी आशा डॉ. निशांतकुमार यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading