परिवहन बसचा एका रहिवाशाला धक्का लागल्यानं संतप्त जमावानं परिवहन सेवेच्या चालकाला मारहाण केल्याचा प्रकार

वागळे आगाराकडे येणा-या परिवहन बसचा एका रहिवाशाला धक्का लागल्यानं संतप्त जमावानं परिवहन सेवेच्या चालकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला. वृंदावन सोसायटी इथून वागळे आगार मार्गावर धावणा-या परिवहन सेवेच्या बसची धडक आगाराबाहेरील रिक्षाला लागली. या रिक्षाचा धक्का लागून स्थानिक व्यक्ती खाली पडल्यानं संतप्त जमावानं परिवहन सेवेच्या बसचा चालक राहुल धनगर याला केबिनची काच फोडून बाहेर काढून मारहाण केली. जमावानं धनगरला दगड आणि रॉडनं मारहाण केली. यामध्ये धनगरच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली. त्याला सिव्हील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मारहाण करणा-या सूरज गुप्ताला अटक करण्यात आली आहे. परिवहन सेवेच्या कर्मचा-यांवर हल्ला करणा-यांवर कडक कारवाई करण्याची मागणी टीएमटी एम्प्लॉईज युनियननं केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading