ठाणे महापालिका प्रशासनानं बॉम्बे कॉलनी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये अनधिकृतपणे करण्यात आलेले वाढीव बांधकाम जमिनदोस्त करण्यात आलं आहे. मुंब्रा येथील बॉम्बे आरे कॉलनीमधील ईस्माईल मंझिल वरील ८ फ्लॅटचे नव्याने झालेले वाढीव अनधिकृत बांधकाम या कारवाईत संपूर्णपणे तोडण्यात आले. रमजानच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी महापालिकेचे अधिकारी -कर्मचारी हे ट्रॅफीक मुक्त रस्ते ठेवण्यात व्यस्त होते. या काळात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं झाली असून या बांधकामांवर कारवाई करण्याची मोहिम पालिकेनं पुन्हा सुरू केली आहे.