युतीच्या उमेदवारांची आघाडी वाढली

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना १ लाख ७ हजार ९४६ मतांची आघाडी मिळाली आहे. १ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास हाती आलेल्या आकडेवारीनुसार राजन विचारे यांना १ लाख ७० हजार ९२७ तर आनंद परांजपे यांना ६२ हजार ९८१ मतं मिळाली आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना १ लाख ३४ हजार ८२९ मतांची आघाडी मिळाली आहे. श्रीकांत शिंदे यांना १ लाख ९२ हजार ४८३ तर बाबाजी पाटील यांना ५७ हजार ६५४ मतं मिळाली आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना ४२ हजार
४८२ मतांची आघाडी मिळाली आहे. कपिल पाटील यांना १ लाख ६६ हजार ६६५ तर काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना १ लाख २४ हजार १८३ मतं मिळाली आहेत.

पालघर मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित ९३ हजार ९८ मतांनी आघाडीवर आहेत. राजेंद्र गावित यांना ५ लाख ५ हजार ९४१ मतं तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना ४ लाख १२ हजार ८४३ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading