जिल्ह्यात युतीचे उमेदवार आघाडीवर

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना ४१ हजार ७६५ मतांची आघाडी मिळाली आहे.

१ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास हाती आलेल्या आकडेवारीनुसार कपिल पाटील यांना १ लाख ६४ हजार ३५६ तर काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना १ लाख २२ हजार ५९१ मतं मिळाली आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना १ लाख ३१ हजार ६९२ मतांची आघाडी मिळाली आहे. श्रीकांत शिंदे यांना १ लाख ८५ हजार ६५० तर बाबाजी पाटील यांना ५३ हजार ९५८ मतं मिळाली आहेत.ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना १ लाख ३ हजार ३६२ मतांची आघाडी मिळाली आहे. राजन विचारे यांना १ लाख ६५ हजार ३०७ तर आनंद परांजपे यांना ६१ हजार ३४५ मतं मिळाली आहेत.

पालघर मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित ९१ हजार ६९४ मतांनी आघाडीवर आहेत. राजेंद्र गावित यांना ४ लाख ८६ हजार ५५० मतं तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना ३ लाख ९४ हजार ८५६ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading