लोकसभा निवडणुकीत मतदान करावं यासाठी एका सायकल रॅलीचं आयोजन

लोकसभा निवडणुकीत मतदान करावं असा संदेश काल एका सायकल रॅलीतून देण्यात आला. स्वीप उपक्रमांतर्गत जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. काल यासाठी एका सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला क्रीशनानी आणि जिल्हाधिका-यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली. या रॅलीत सहभागी होत ठाणेकर सायकल पटूंनी मतदानाचा संदेश दिला. शासकीय विश्रामगृहासमोरून या रॅलीची सुरूवात झाली. जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निरिक्षक शैली क्रिशनानी, स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी रेवती गायकर, अपर्णा सोमाणी, ज्येष्ठ सायकलपटू श्यामसुंदर केसरकर, देवीदास ठोंबर तसंच अन्य अधिकारी आणि कर्मचारी तसंच सायकलपटू मोठ्या संख्येनं या सायकल रॅलीत सहभागी झाले होते. ही सायकल रॅली चिंतामणी ज्वेलर्स, गडकरी रंगायतन, साईकृपा हॉटेल, राम मारूती रस्ता, गोखले रस्ता, संत नामदेव चौक, अल्मेडा सिग्नल, खोपट सिग्नल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात विसर्जित झाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading