राष्ट्रीय स्तर जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंनी एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड आयोजित राष्ट्रीय स्तर जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंनी एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं आहे. उत्तर प्रदेश येथे झालेल्या या स्पर्धेत ११ आणि १४ वर्ष वयोगटात ही २ पदकं पटकावली आहे. ठाण्यातील डीएव्ही पब्लिक स्कूलच्या प्रिन्स जैन यानं १४ वर्ष गटात रिंग्ज प्रकारात सुवर्ण तर नालंदा पब्लिक स्कूलच्या त्रिशा शहा हिनं ११ वर्ष गटात रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत ठाण्यातून सायना वेखंडे, निती मेहता हे स्पर्धकही सहभागी झाले होते. हे सर्व खेळाडू सरस्वती शाळेतील जिल्हा जिम्नॅस्टीक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतात.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading