police political shivsena

पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर १६० पोलीस कुटुंबांचं वर्तकनगर येथील आकृतीच्या प्रकल्पात स्थलांतर

वर्तकनगर येथील धोकादायक झालेल्या पोलीस वसाहतीमधील पोलीस कुटुंबियांच्या स्थलांतराबाबत निर्माण झालेला पेच पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर सुटला असून सुमारे १६० कुटुंबांचं वर्तकनगर येथील आकृतीच्या प्रकल्पात स्थलांतर करण्यात आलं आहे.

political shivsena social

सिग्नल शाळेतील शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या त्या दोन मुलांचा शैक्षणिक खर्च शिवसेना उचलणार

रस्त्यावरील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठाणे महापालिकेनं सुरू केलेल्या सिग्नल शाळेच्या अभूतपूर्व प्रयोगाला यश आलं असून सिग्नल शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाची जबाबदारी शिवसेना उचलणार आहे. सिग्नल शाळेतील मोहन काळे आणि दशरथ पवार हे दोघेही शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. पालकमंत्र्यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांचा सत्कार केला त्यावेळी या विद्यार्थ्यांना त्यांच्या […]

political shivsena

समूह विकास योजनाच रद्द करण्याची माजी महापौर अनंत तरे यांची पक्ष्प्रमुखांकडे मागणी

समूह विकास योजनेवरून शिवसेनेमध्येच मतभेद असून शिवसेनेचे माजी महापौर अनंत तरे यांनी समूह विकास योजना रद्द करावी अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

political shivsena

कोकण पदवीधर मतदारसंघात माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपचा हिशेब चुकता करण्यासाठी शिवसेनेने विधान परिषदेची कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक नेटाने लढण्याचा इरादा व्यक्त केला आहे.

political shivsena

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची समूह विकास योजनेवर हरकत

समूह विकास योजना जर खरोखरच अस्तित्वात आली तर शहराचा पूर्ण कायापालट होऊ शकतो. मात्र या योजनेतील संभ्रमतेमुळं या योजनेला वाढता विरोध होत आहे.

health political shivsena

कळवा रूग्णालयात एमआरआय आणि अत्याधुनिक सिटी स्कॅनची सुविधा

गोरगरिब रूग्णांना एमआरआय आणि सिटी स्कॅन सारख्या सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी रूग्णालयात साकारलेल्या एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधेचं लोकार्पण शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झालं.

political shivsena

पर्यायी रस्त्यांवरील टोल वसुली बंद होणार नाही – सार्वजनिक बांधकाम मंत्री

एकीकडे मुंब्रा बाह्यवळण रस्त्याचं काम होईपर्यंत ऐरोली आणि ठाण्याचे टोल बंद करण्याची मागणी राष्ट्रवादीनं केली असतानाच दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी मात्र पर्यायी रस्त्यांची टोल वसुली बंद होणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

political shivsena

समूह विकास योजनेत सर्व झोपड्या तसंच अनधिकृत इमारतींचा समावेश करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शहरातील सरसकट सर्व झोपड्या आणि अनधिकृत इमारतींचा समावेश समूह विकास योजनेत करावा अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.