Ncp political

१५ दिवसात वीजेचा लपंडाव न थांबवल्यास वीज मंडळाच्या कार्यालयांवर आंदोलन छेडण्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा

वीजेचा लपंडाव थांबवावा अन्यथा जिल्ह्यातील सर्वच वीज मंडळाच्या कार्यालयांवर आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

police political shivsena

पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर १६० पोलीस कुटुंबांचं वर्तकनगर येथील आकृतीच्या प्रकल्पात स्थलांतर

वर्तकनगर येथील धोकादायक झालेल्या पोलीस वसाहतीमधील पोलीस कुटुंबियांच्या स्थलांतराबाबत निर्माण झालेला पेच पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर सुटला असून सुमारे १६० कुटुंबांचं वर्तकनगर येथील आकृतीच्या प्रकल्पात स्थलांतर करण्यात आलं आहे.

congress political

म्हाडा वासियांची शिवसेनेच्या आजी-माजी नगरसेवकांनी दिशाभूल केल्याचा विक्रांत चव्हाण यांचा आरोप

समूह विकास योजनेमध्ये संभ्रम निर्माण झाला असतानाच लोकमान्यनगर, सावरकरनगर मधील म्हाडा वासियांना शिवसेनेच्या आजी-माजी नगरसेवकांकडून दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये ठाणे महापालिकेतील शहर विकास विभागाचे अधिकारी देखील सामील असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात शिवसेना नगरसेवकांनी म्हाडा वासियांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत पालिकेचा एक […]

Bjp political

निरंजन डावखरे यांना स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना स्वाभिमान पक्षानं पाठिंबा जाहीर केला आहे.

congress court political

राहुल गांधींविरोधातील मानहानीच्या दाव्यात १० ऑगस्टला पुढील सुनावणी

सध्याचं सरकार हे श्रीमंत लोकांचं सरकार असून शेतकरी, महागाई आणि बेरोजगारी या तिन्ही मुद्यावर नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भिवंडी येथे बोलताना व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात केलेल्या वक्तव्यामुळं दाखल झालेल्या मानहानीच्या दाव्यात उपस्थित राहण्यासाठी राहुल गांधी भिवंडीत आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी ही टीका केली. गेल्या लोकसभा निवडणुकीत […]

political shivsena social

सिग्नल शाळेतील शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या त्या दोन मुलांचा शैक्षणिक खर्च शिवसेना उचलणार

रस्त्यावरील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठाणे महापालिकेनं सुरू केलेल्या सिग्नल शाळेच्या अभूतपूर्व प्रयोगाला यश आलं असून सिग्नल शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाची जबाबदारी शिवसेना उचलणार आहे. सिग्नल शाळेतील मोहन काळे आणि दशरथ पवार हे दोघेही शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. पालकमंत्र्यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांचा सत्कार केला त्यावेळी या विद्यार्थ्यांना त्यांच्या […]

Bjp political

गतवैभव मिळवण्यासाठी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोकण पदवीधर मतदारसंघ हा एकेकाळी भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होता. या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे गतवैभव मिळवण्यासाठी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे.

Ncp political

फर्जंदला प्राईम टाईम दिला नाही. तर,मल्टीप्लेक्समध्ये कोणताचा प्राईमटाईम होऊ देणार नाही-जितेंद्र आव्हाड

शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या मावळ्यांच्या कर्तबगारीवर आधारीत ‘फर्जंद’ या सिनेमाला मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाईम देण्यात यावा, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली असून जर, फर्जंदला प्राईम टाईम दिला नाही. तर,मल्टीप्लेक्समध्ये कोणताचा प्राईमटाईम होऊ देणार नाही, असा इशाराही दिला आहे. 

political shivsena

समूह विकास योजनाच रद्द करण्याची माजी महापौर अनंत तरे यांची पक्ष्प्रमुखांकडे मागणी

समूह विकास योजनेवरून शिवसेनेमध्येच मतभेद असून शिवसेनेचे माजी महापौर अनंत तरे यांनी समूह विकास योजना रद्द करावी अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Bjp political

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ठाण्यात उद्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ठाण्यात उद्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे.