TMC

अतिशय गजबजलेल्या, गर्दीने ओसंडून वाहणा-या आणि बकाल अवस्थेत दिसणा-या मानपाडा ब्रीजखालील जागेने टाकली कात

मानपाड्यासारख्या अतिशय गजबजलेल्या, गर्दीने ओसंडून वाहणा-या आणि बकाल अवस्थेत दिसणा-या मानपाडा ब्रीजखालील जागेने आता कात टाकली आहे.

TMC

स्वच्छ सर्वेक्षणासाठी अधिका-यांनी योग्य नियोजन करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

केंद्र शासनाच्या वतीनं २०१८ मध्ये करण्यात येणा-या स्वच्छ सर्वेक्षणासाठी अधिका-यांनी योग्य नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

TMC

महापालिका क्षेत्रात २५ हजार वृक्षांचं पुनर्रोपण करण्यात येणार

महापालिका क्षेत्रात २५ हजार वृक्षांचं पुनर्रोपण करण्याच्या महत्वाच्या निर्णयाबरोबरच शहरातील उद्यानांच्या आणि तलावांच्या संवर्धनाविषयी वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये चर्चा करण्याचा तसंच वृक्ष प्राधिकरणाच्या प्रत्येक सदस्यानं या समितीचं कामकाज पारदर्शी करण्याच्या निर्णयावर समितीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आलं.

TMC

उड्डाणपूलाचा खालील भाग रोषणाईनं झळाळला

वर्षानुवर्षे भंगार गाड्या, अनधिकृत पार्कींग, गर्दुल्यांचा अड्डा बनलेल्या आणि येणा-या जाणा-या नागरिकांसाठी मनस्ताप ठरलेल्या नितीन कंपनीजवळ पूलाखाली आता रंगीबिरंगी फुलांचे उद्यान, विविध खेळांच्या सुविधा, नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, बाळगोपाळांसाठी खेळणी आणि लक्ष वेधून घेणारी आकर्षक विद्युत रोषणाई आदी विविध सुविधांनी उड्डाणपूलाखाली नंदनवन फुललं आहे.

Bjp political TMC

महापालिकेतील दोन समित्यांच्या माध्यमातून अपात्र ठेकेदारांना पात्र ठरवण्याचा उद्योग – भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचा आरोप

निविदा छाननी समिती आणि निविदा समिती या दोन्ही समित्या अनावश्यक असून या समितीमधून अपात्र ठेकेदारांना बेकायदेशीररित्या पात्र ठरवण्याचा उद्योग सर्रास सुरू असल्याचं भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणलं.

TMC

दिवाळीमध्ये ध्वनी आणि वायु प्रदुषण टाळण्याचं महापौरांचं आवाहन

दिवाळीमध्ये ध्वनी आणि वायु प्रदुषण होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात व्यापक स्वरूपात जनजागृती करावी तसंच नागरिकांनी देखील आवाज विरहित फटाक्यांची आतिषबाजी करावी असं आवाहन महापौरांनी केलं आहे.

TMC

वृक्ष पडल्यामुळं मृत्यूमुखी पडलेल्या किशोर पवार यांच्या पत्नीला पालिकेत नोकरी देण्याचं आयुक्तांचं आश्वासन

वृक्ष पडल्यामुळं मृत्यूमुखी पडलेल्या किशोर पवार यांच्या पत्नीला पालिकेत नोकरी देण्याचं आश्वासन पालिका आयुक्तांनी पुन्हा दिलं आहे.